शुक्रवार – ०६ सप्टेंबर २०१९
डोमेस्टिक मार्केट: देशभरात लिफ्टिंग प्रेशर असल्याने तसेच नफा वसुलीमुळे मार्केट १५ ते ३० रुपयाने कमी होते.
महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार ३१७० ते ३२५० रुपये राहिला तर M/30 चा व्यापार ३३९० ते ३३७५ रुपये राहिला. जो कालच्या तुलनेत १० ते १५ रुपयांनी कमी होता.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार ३४०० ते ३४५० रुपये होता. काल पेक्षा आज येथील बाजार थोडा शांत दिसला.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार ३२२५ ते ३२७५ रुपये तर M/30 चा व्यापार ३३५० ते ३४०० रुपये होता. आजच्या येथील किमती ३० रुपयाने घटल्या तसेच मागणीतही कमतरता दिसली.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार ३५७० ते ३६४० रुपये होता तसेच बाजारातील मागणी कमी राहिली.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार ३४४० ते ३५२५ रुपये होता तसेच मागणीही कमी राहिली.
*दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: येथील मार्केट आज अडचणीचे राहिले. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट ३०२.१ डॉलर राहिला तर NY#११ रॉ फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट १०.९१ डॉलर वर होता. कारखानदार नुकत्याच घोषित झालेल्या MAEQ निर्यात योजनेच्या नोटिफिकेशन ची वाट पाहत असल्याने बाजारात कोणती निर्यातीसाठी ऑफर दिसून येत नाही. हि योजना घोषित होताच पांढऱ्या साखरेची निर्यात सुरु होईल व कच्या साखरेची निर्यात त्याचे उत्पादन नोव्हेंबर मध्ये सुरु झाल्यांनतर सुरु होईल.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१.७२ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.० मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३९८१ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५५.४६ डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स ३३७ अंकांनी वर येऊन ३६९८१ अंकांवर तर एनएसई निफ्टी ९८ अंकांनी वर येऊन १०९४६ वर थांबले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.