सोमवार – ०९ सप्टेंबर २०१९
डोमेस्टिक मार्केट: देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली.
महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार ३१५० ते ३२३० रुपये राहिला तर M/30 चा व्यापार ३२९० ते ३३७५ रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार ३४०० ते ३४५० रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार ३२२५ ते ३२७५ रुपये तर M/30 चा व्यापार ३३५० ते ३४०० रुपये होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार ३५७० ते ३६४० रुपये होता तसेच बाजारातील मागणी कमी राहिली.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार ३३७५ ते ३५२५ रुपये होता तर M/30 चा व्यापार ३४५० ते ३६०० रुपये राहिला.
*दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: येथील मार्केट आज अनिश्चित व मंदीचे राहिले. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट ३०३.८७ डॉलर राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट ११.०५ डॉलर वर होता. कारखानदार नुकत्याच घोषित झालेल्या MAEQ निर्यात योजनेच्या नोटिफिकेशन ची वाट पाहत असल्याने बाजारात कोणती निर्यातीसाठी ऑफर दिसून येत नाही. ही योजना घोषित होताच पांढऱ्या साखरेची निर्यात सुरु होईल.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१.७० मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.० मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ४०९० रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५७.०५ डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स १६३ अंकांनी वर येऊन ३७१४५ अंकांवर तर एनएसई निफ्टी ५६ अंकांनी वर येऊन ११००३ वर थांबले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.