‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

डोमेस्टिक मार्केट: आज बाजार संथगतीने सुरू झाला तथापि देशातील काही भागात मागणी होती.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3250 रुपये राहिला.

दक्षिण कर्नाटकः S/30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला.

उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता.

गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3160 रुपये होता, तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला.

कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3560 रुपये राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3375 रुपये होता, तर M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3400 रुपये राहिला.

कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: 2018-19 च्या हंगामामधील 150 पेक्षा कमी इक्युमझा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती. एक्स फॅक्टरी नुसार, पांढर्‍या साखरेची मागणी 20500 ते 20700 रुपये प्रति मेट्रिक टन राहिली. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 332.60 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.48 सेन्ट्स होते. भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी संकेत 330$ ते 332$ राहिला.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.444 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.1636 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4024 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 56.31 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 21.47 अंकांनी वर येऊन 40345.08 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 5.30 अंकांनी वर येऊन 11913.45 बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here