‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार – १२ ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज मार्केट मध्ये साखरेची मागणी मिश्रित राहिली. महाराष्ट्रात, मुसळधार पाऊस आणि NH४ वरील पूर परिस्थितीमुळे लोडिंग थांबविण्यात आले आहे. कारखान्यांचे भाव ३११० ते ३१६० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३१०० ते ३१५० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३३४० ते ३३८० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३२० ते ३३६० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३२१० ते ३३०० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३३०० ते ३३२५ रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज स्थिर होता. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३१८.२० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.८५ सेंट्स मध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३२५ ते ३३० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४० ते ३४५ डॉलर राहिले.

एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २०२०० ते २०५०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २१५०० ते २१८०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१.३१ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३९०४ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५४.६७ डॉलर होते. आज बकरी ईद च्या निमित्ताने बीएसई आणि एनएसई बंद राहिल्याने भारतीय निर्देशांकांचा व्यवहार बंद राहिला

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here