सोमवार – २२ जुलै २०१९
डोमेस्टिक मार्केट: आज देशातील मार्केट मध्यम गतीचे राहिले. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव ३१०० ते ३१४० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३०४० ते ३०८० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३१८० ते ३३१० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३२१० ते ३३३५ रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३१२० ते ३१७० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३१७५ ते ३२०० रुपये मध्ये झाली.
इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज शांत राहिला. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३१६.३० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.६३ सेंट्स मध्ये झाला.
कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३३६ ते ३३८ डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३५२ ते ३५५ डॉलर राहिले.
एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २१००० ते २१३०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २२००० ते २२२०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ६८.९० मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ३.७ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३८८८ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५६.३० डॉलर होते.
इक्विटी : बीएसई सेंसेक्स ३०५ अंकांनी घसरून ३८०३१अंकांवर तर एनएसई निफ्टी ८२अंकांनी घसरून ११३३७अंकांवर बंद झाले.