‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

बुधवार – ३१ जुलै २०१९

डोमेस्टिक मार्केट: ऑगस्ट कोट्याच्या प्रतीक्षेमुळे बाजारात साखरेची संमिश्र मागणी दिसून आली. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव ३११० ते ३१५० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३०५० ते ३०९० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३१९० ते ३३२० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३२१० ते ३३४० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३११० ते ३१५० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३२२५ ते ३३०० रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज स्थिर राहिला. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३२२.६० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार १२.१३ सेंट्स मध्ये झाला.
कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३२८ ते ३३० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४२ ते ३४५ डॉलर राहिले.

एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी १९७०० ते १९९०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २०६०० ते २०८०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ६८.७९ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ३.७ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ४०३३ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५८.५४ डॉलर होते.

इक्विटी : बीएसई सेंसेक्स ८३ अंकांनी वाढून ३७४८१ अंकांवर तर एनएसई निफ्टी २८अंकांनी वर चढून ११११३ अंकांवर बंद झाले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here