डालमिया भारत शुगर, फाउंडेशनचे दीक्षा कौशल्य केंद्र दिशादर्शक : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार

सांगली : शिराळा येथे डालमिया भारत शुगर व डालमिया भारत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दीक्षा कौशल्य केंद्राच्या उद्घाटन व शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते झाले. यावेळी डालमिया ग्रुपच्यावतीने सुरू केलेल्या दिशा कौशल्य विकास केंद्रातून युवकांनी प्रशिक्षण घ्यावे. भविष्यात त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळेल, असे प्रतिपादन साखर आयुक्त खेमनार यांनी केले.

यावेळी डालमियाचे युनिट हेड संतोष कुंभार म्हणाले की, शिराळा येथे हे २१ वे सेंटर सुरू होत आहे. या केंद्रातून वार्षिक ३६० युवक, युवती, महिला यांना तीन महिन्यांचे उद्योग व व्यावसायिक स्वरूपाचे ट्रेनिंग दिले जाईल. दहा राज्यांत वीस दिशा कौशल्य सेंटर उभी केली आहेत. दरम्यान, प्रादेशिक सहसंचालक गोपाळ माळवे, ऊस शास्त्रज्ञ डॉ. आबासाहेब साळुंखे, युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांनी मनोगत व्यक्त केले. केन हेड प्रमुख सुधीर पाटील, चीफ इंजिनीअर किरण पाटील, एचआर हेड महेश कवचाळे, उत्पादन हेड दुर्गेश तोमर, दीक्षा सेंटर मॅनेजर आनंद डोणे, नरेश देशमुख, उपस्थित होते. सीनिअर केन मॅनेजर युवराज चव्हाण यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here