डालमिया शुगरची ५ लाख २८ हजार टन ऊस गाळप करुन हंगामाची सांगता

सांगली : डालमिया भारत शुगर युनिट : निनाईदेवी या साखर कारखान्याने या हंगामात उच्चांकी ५ लाख २८ हजार ९१२ मे. टन उसाचे गाळप केले आहे. करूंगली – आरळा (ता. शिराळा) येथील कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ युनिट हेड संतोष कुंभार व असिस्टंट जनरल मॅनेजर सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कारखान्यातील सर्व विभागाने चांगल्या पद्धतीने केलेल्या कामाचे हे सांघिक यश आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.

असिस्टंट जनरल मॅनेजर (केन) सुधीर पाटील यांनी सांगितले की, कुंभार साहेबांचे मार्गदर्शन व कारखान्यातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कमुळे हंगामात उच्चांकी गाळप झाले आहे. डालमिया शुगर शेतकरी व वाहतूक कंत्राटदार यांच्या अडीअडचणीला उभा राहिला आहे. तर युनिट हेड संतोष कुंभार यांनी सांगितले की, शेती विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम करीत कारखान्याचे गाळप सुरू ठेवले. यावेळी चिंतामणी पाटील, किरण पाटील, महेश कवचाळे, दुर्गेश तोमर, रणधीर चव्हाण, रविकुमार कर्नाटकी, राजेंद्र नाईक, नरेश देशमुख, निवृत्ती नायकवडी, ज्ञानदेव पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here