मुंबई : दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रिज कंपनीने ‘बिझनेस-टू-कन्झ्युमर’ क्षेत्रात प्रवेश घेतला आहे.
याबाबत कंपनीचे संचालक बी. बी. मेहता यांनी सांगितले की, आम्ही दालमिया उत्सवच्या प्रारंभाबाबत उत्साही आहे. जागतिक स्तरावरील आणि पर्यावरणास अनुकूल उत्पादन प्रक्रियेचा वापर करून ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेची साखर उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
देशातील १२ राज्ये आणि केंद्र शासीत प्रदेशांमध्ये ब्रँडेड पॅकेट आणि पाउचमध्ये सल्फरमुक्त पांढरी क्रिस्टल साखर आणि नॅचरल ब्राउन शुगर लाँच करण्याचा प्रस्ताव असल्याचे कंपनीने सांगितले.
यामध्ये हरियाणा उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, मध्य प्रदेश, चंदीगढ, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.
अमेझॉन, बिग बास्केट आणि फ्लिपकार्ट यांसारख्या बड्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणि ऑफलाइन स्टोअर्सवरही आमची उत्पादने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले.