कोल्हापूर : अलीकडेच झालेल्या पावसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 506 गावांमध्ये पीकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अधिक़ार्यांनी सांगितले की,ऊस, सोयाबीन, भूईमुग आणि तांदळाच्या पीकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अधिक़ार्यांनी सांगितले की, पंचगंगा नदीच्या काठी घेण्यात येणारी पीके खराब झाली आहेत. अनेक ठिकाणी ऊसाची शेते पुराच्या पाण्यात बुडली आहेत. खूप वेळ पाण्यात राहिल्यामुळे पीक कुजण्याची शक्यता आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यामध्ये 22,000 हेक्टर मद्ये पिकांचे नुकसान झाले असल्याची शंका आहे. अधिक़ार्यांनी सांगितले की, जवळपास 40,000 कुटुंबांवर याचा परिणाम होवू शकतो. राधानगरी तालुक्यातील 105, करवीर तालुका आणि पन्हाळा तहसील च्या 97 गावांमध्ये पीकांचे नुकसान झाले आहे. या महिन्याच्या शेवटी एका अंतिम मूल्यांकनाची आशा आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.