बेळगावी, कर्नाटक: गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक तालुक्यांमध्ये पीकांचे नुकसान होण्याबरोबरच, मोठ्या संख्येमध्ये घरांचीही पडझड झाली आहे. जिल्ह्यामध्ये 35,000 हेक्टर पेक्षा अधिक उस, सोयाबीन आणि कापसावर पावसाचा परिणाम झाला आहे.
चार दिवसांपूर्वी हुक्केरी मध्ये पावसामुळे घर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यामध्ये 270 घरे पडली आहेत. उपायुक्त एम जी हिरेमथ यांच्यानुसार, कित्तूर, बैलहोंगल, चिक्कोडी, गोकाक, खानापूर, रामदुर्ग आणि रायबाग तहसीलमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या सर्व तहसील परिसरामध्ये या आठवड्यात सलग तीन दिवसांपर्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. संबंधित तहसीलमध्ये सरकारी अधिकार्यांनी नुकसानीचा आकडा काढण्याच्या प्रक्रियेत गती आणली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.