पिकात पाणी भरल्याने शेतकर्‍यांच्या ऊस पिकाचे नुकसान

बलरामपूर : मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पिके पाण्यात गेली आहेत, त्यामुळे ऊसाच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. उतरौला तहसील क्षेत्रातील दीड डझन पेक्षा अधिक गावातील शेतकर्‍यांचे नशिबच फुटले आहे. पुरामुळे झालेल्या पीकाच्या नुकसानीची भरपाई प्रशासनाने द्यावी, अशी मागणी क्षेत्रातील शेतकर्‍यांनी केली आहे.

शेतकरी विजय कुमार मिश्र, रामनरेश व डीडीसी चंद्रप्रकाश पांड्ये आदींनी उतरौला एसडीएम यांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, राप्ती नदी व पहाडांवरील नाल्यांतील पुराचे पाणी या गावातील पीकांमध्ये भरले आहे. नारायणपूर मझारी, चंदापूर, कुडउ, पचौथा, टेढवा, चूचूहिया, मझारी दूल्हा, लखमा, महुआ, घाटम, बभनपुरवा, भगवतापूर, लारम, नेवसा, राजघाट सीरिया, कोडर, बाघाजोत, कटरा, फत्तेपूर, रुस्तम नगर, महरीचक, महुवाधनी, पांड्येजोत, बौडिहार, मलमलिया, थरुवा, रसूलाबाद आदी गावांमध्ये शेकडो एकर जमिनीवर दोन ते अडीच फूटापर्यंत पाणी महिन्यांपासून भरले आहे.

चांगल्या प्रजातीच्या ऊसाची शेतामध्ये लागवड केली होती. चांगला पैसा खर्च करुन नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकर्‍यांनी आपल्या शेतात ऊसाची लागवड केली होती. पण आता ऊसाचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीच्या ऊसाचेही त्यांना पैसे दिलेले नाहीत.

बजाज साखर कारखान्याने इटईमैदा उतरौला तहसील च्या जवळपास 35 हजार शेतकर्‍यांचे करोडो रुपये दिले नाहीत.ऊस पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे. उतरौला एसडीएम अरुण कुमार गौड यांनी शेतकर्‍यांना आशवासन दिले की, त्यांची समस्या उच्च अधिक़ार्‍यांकडे जावून लवकरच सोडवू.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here