इंदौर : राज्यातील मध्य आणि पश्चिम क्षेत्रातील हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे आणि नुकसानीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत जोरदार वाऱ्यासह गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. हवामान विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आगामी २४ तासात आणखी जोरदार वारे वाहील अशी शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात २ ते ४ डिग्रीची घसरण होईल. त्यानंतर दहा मार्चनंतर पुन्हा तापमान वाढेल अशी शक्यता आहे.
नवी दुनिया वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशात गेल्या तीन दिवसांत बदललेल्या हवामानामुळे विविध भागात तयार पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. या वर्षी पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याने उच्चांकी गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र, हवामानामुळे यावर परिणामाची शक्यता आहे. आधी अचानक तापमान वाढले. त्यामुळे गव्हाचा आकार कमी होईल अशी शक्यता व्यक्त झाली. त्यानंतर तयार पिकावर पाऊस आणि गारपिटीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय किसान संघाचे दिलिप मुकाती यांच्या म्हणण्यानुसार, इंदौरच्या आसपास बुधवारी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. आता तयार गव्हाची कापणी करण्यासही काही काळ लागले. दर्जा खालावण्याची शक्यता असल्याने दरात घसरण होईल.