सोलापूर : ‘दामाजी कारखान्याने कामगारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी कामगारांना १७ दिवसांच्या पगाराएवढा बोनस अदा केला आहे. कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपला ऊस दामाजी कारखान्याच्या गळीतासाठी पाठवून सहकार्य करावे. कारखाना पाच लाख टन ऊस गळीताचे उद्दिष्ट सहजच गाठेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी व्यक्त केला. रविवारी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ३२ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सुधाकर इंगळे महाराज यांच्या हस्ते व धनश्री आणि सीताराम परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळंगे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते बोलत होते.
संचालक भारत बेदरे व आशा बेदरे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुधाकर इंगळे महाराज म्हणाले की, संचालक मंडळाने काटकसरीने पारदर्शी काम करुन कारखाना उत्तमप्रकारे चालविला आहे. कारखान्याला अडचण असताना संस्था चालली पाहिजे व टिकली पाहिजे.
शिवाजीराव काळुंगे, नंदकुमार पवार यांची भाषणे झाली. रामकृष्ण नागणे, व्हा. चेअरमन तानाजी खरात, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणूकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर उपस्थित होते. संचालक दिगंबर भाकरे यांनी आभार मानले.