डोडोमा (तंजानिया) : तंजानियातील डांगोटे इंडस्ट्रीज लिमिटेड चे अध्यक्ष अलिको डांगोटे यांनी सांगितले की, 2021 पर्यंत 30 बिलियन डॉलर इतक्या रेव्हेन्यू चे कंपनीनेे ध्येय ठेवले आहे. वित्तमंत्र्यांनी कंपनीच्या लागोस येथे असणार्या डांगोट तेल रिफाइनरी आणि उर्वरक परियोजनेचा दौरा केला, त्यावेळी डांगोटे बोलत होते.
ते म्हणाले, कंपनी नव्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहे. 2021 मध्ये रिफायइनरीचे काम पूर्ण झाल्यावर कंपनीचा ग्रुप रेव्हेन्यू 4 बिलियन डॉलरहून वाढून 30 बिलियन डॉलर होईल. सध्या कंपनीकडे रिफाइनरी, पेट्रोकेमिकल आणि फर्टिलायझर चे प्लांट आहेत. शिवाय इतर क्षेत्रात गुंतवणूक करण्याबराबेरच स्थानीय स्तरावर साखर आणि सीमेंट ची क्षमता वाढत आहे. ते म्हणाले, राष्ट्राची निर्मिती केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर यासाठी नागरीक आणि उद्योजकांनीही सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहेत.
वित्तमंत्री जैनब अहमद यांनी रिफाइनरीच्या योजनेचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, प्रति दिवस 6,50,000 बैरल च्या उत्पादन क्षमते बरोबरच आज ही जगातील सर्वात मोठी एकल रिफायनरी आहे. मंत्र्यांनी आशा व्यक्त केली की, तंजानिया लवकरच परिष्कृत पेट्रोलियम उत्पादनांची आयात बंद करुन जगातील इतर देशांना आपल्या उत्पादनाची निर्यात सुरु ठेवण्यात सक्षम होवू शकेल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.