दौराला साखर कारखाना बनवणार सॅनिटायजर

मेरठ(उत्तर प्रदेश): कोरोना वायरसच्या प्रतिबंधासाठी सॅनिटायजरची मागणी वाढत आहे. यामध्ये 60 ते 70 टक्के अल्कोहोल असते. याबाबत साखर कारखान्यांना सॅनिटायजर उत्पादनासाठी शासनाने परवाना देण्याचे आदेश दिले आहेत. मेरठ जनपद मध्ये तीन साखर कारखाने इथेनॉल चे उत्पादन करतात. यामध्ये दौराला साखर कारखान्याने २ हजार लीटर प्रति दिवस उत्पादन करण्यासाठी ड्रग विभागाकडून परवानगी मागितली आहे. या बरोबरच नंगलामल आणि किनौनी साखर कारखान्याचेही या दिशेने प्रयत्न सुरु आहेत.

मेरठ मध्ये ६ साखर कारखाने आहेत. यामध्ये केवळ तीन दौराला, नंगलामल व किनौनी कारखाना प्रति दिन इथेनॉलचे उत्पादन करतात. सैनिटाइजर ची मागणी पाहून सरकारने कारखान्यांना उत्पादन मात्रा निश्चित करण्याचे सांगितले आहे.

दौराला कारखान्याचे चे जनरल मॅनेजर संजीव कुमार म्हणाले, आमच्या इथे एक लाख लीटर प्रतीदिन इथेनॉल बनवले जाते. यामुळे २ हजार लीटर सैनिटाइजर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ड्रग विभागाकडून परवानगी साठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच पाच आणि दहा लीटरच्या पॅकिंग मध्ये सॅनिटायजर उपलब्ध केले जाईल.

मेरठ चे जिल्हाधिकारी डॉ. दुष्यंत कुमार म्हणाले, बाजारातील वाढती मागणी पाहून साखर कारखाने सॅनिटायजर चे उत्पादन करणार. त्यांचा निर्णय वाखाणण्याजोगा आहे. लवकरच सॅनिटायजर उत्पादन सुरु होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here