दौलत साखर कारखान्याच्या वैभवाला धक्का लागू देणार नाही : ‘दौलत-अथर्व’चे अध्यक्ष मानसिंग खोराटे

कोल्हापूर : केवळ स्वतःच्या राजकारणासाठी दौलत कारखाना व कामगारांना वापरणाऱ्यांना आता माझी भीती वाटू लागल्याने समाजात वेगवेगळ्या वावड्या उठवल्या जात आहेत; पण मी ‘दौलत’च्या वैभवाला धक्का लागू देणार नाही, असे मत ‘दौलत-अथर्व’चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केले.गेल्या पाच-सहा वर्षांत मी चंदगड तालुक्यातील अनेक अडचणी जवळून पहिल्या आहेत.माझ्या जीवनातील चढ-उताराची मला जाण आहे.मी शेतकरी कुटुंबातून एक यशस्वी उद्योजक घडलो.त्यामुळे कारखाना अधिक चांगल्या प्रकारे चालविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.

खोराटे म्हणाले, राजकारणामुळे पुन्हा एकदा दौलत साखर कारखाना डबघाईला येणार, अशा अफवा पसरवल्या जात आहेत.पण हे मी कदापि होऊ देणार नाही आणि याचा विश्वास येथील जनतेला आहे. म्हणून वेगवेगळ्या स्तरातून पाठबळ मिळत आहे. कामगार आणि शेतकरी यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही.येथील अपुरी आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, सुशिक्षित बेरोजगारी, निसर्ग सौंदर्याने नटलेला पण दुर्लक्षित असलेल्या पर्यटन विकास यासाठी कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here