‘दौंड शुगर’चे यंदा २० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : अध्यक्ष जगदीश कदम

पुणे : आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्याची दैनिक गाळप क्षमता १७५०० प्रति मे. टनापर्यंत वाढविली आहे. आगामी गाळप हंगामात २० लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. याचबरोबर कारखान्याने गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील उसाच्या अंतिम हप्त्याची रक्कम म्हणून प्रती टन १०० रुपये लवकरच शेतकऱ्यांना अदा करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी दिली. कारखान्याचा सन २०२४-२५ मधील १६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अध्यक्ष कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन इंद्रजीत जगदाळे, उमादेवी जगदाळे, आबासाहेब सुरवसे, स्वातीताई सुरवसे यांच्या हस्ते पार पडला.

अध्यक्ष जगदीश कदम म्हणाले की, मागील हंगामात कारखान्याने १८,०१,८७७.१८६ मे. टन गाळप केले. कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.८२ टक्के राहिला. कारखान्याने गाळप झालेल्या उसाला प्रती टन २,९०० रुपयांप्रमाणे एकूण ५२२.५४ कोटी रुपये दिले आहेत. आता लवकरच १०० रुपये प्रती टनाप्रमाणे शेतकऱ्यांना बिले अदा करण्यात येणार आहे. यामुळे हंगामातील अंतिम ऊस दर ३००० रुपये होईल. आगामी गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दौंड शुगर कारखान्यास गाळपासाठी आपला ऊस पाठवावा. कार्यकारी संचालक शहाजी गायकवाड यांनी हंगामाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी डॉ. संगीता जगदाळे, मल्हार जगदाळे, आर्यन कदम, प्रद्युम्न जोशी, शशिकांत गिरमकर, दीपक वाघ, दिलीप बोडखे, चंद्रकांत सुद्रिक, संदेश बेनके आदी उपस्थित होते.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here