पुणे : ‘‘दौंड शुगर साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात २० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याचा मागील हंगामाचा ३००० रुपये अंतिम भाव झाला आहे. त्यापैकी सन २०२३-२४ मध्ये गाळप झालेल्या उसाला १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे अंतिम हप्ता शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केली. आलेगाव (ता. दौंड) येथील कारखान्याच्या १६ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. पाडव्याच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम झाला.
दौंडचे माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे व त्यांच्या पत्नी उमादेवी तसेच आबासाहेब सुरवसे व त्यांच्या पत्नी स्वाती यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. गळीत हंगामाचा प्रारंभ अध्यक्ष जगदीश कदम यांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याच्या हंगाम २०२४-२५ मधील तयारी पूर्ण झाली आहे. १५ नोव्हेंबरपासून गाळप सुरू होणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. कारखान्याचे संचालक शहाजी गायकवाड, डॉ. संगीता जगदाळे, मल्हार जगदाळे, आर्यन कदम, प्रदुग्न जोशी, शशिकांत गिरमकर, दीपक वाघ, दिलीप बोडखे, चंद्रकांत सुद्रिक, संदेश बेनके आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.