ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदत

बीड : ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात, पण त्यासाठी नोंदणी गरजेची आहे. दरम्यान, महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत कामगारांचा विमा उतरविला जाणार आहे. त्यासाठी ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बीड जिल्हा परिषदेतर्फे उसतोड कामगार नोंदणीसाठी वेबसाईट तयार करण्यात आली असून त्यावर आतापर्यंत ३७,६०० पेक्षा कामगारांनी नोंद केली आहे. २१ सप्टेबर २०२२ रोजी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे ऊसतोड कामगार ज्याठिकाणी वास्तव्याला आहेत, आणि जे सतत मागील तीन वर्षापासून उसतोडणी करत आहेत, अशा ऊसतोड कामगारांची ग्रामसेवकाने सर्वेक्षण करून नोंदणी करावी, असे निर्देश दिलेले आहेत. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १५ ऑगस्टपर्यंत सर्व उसतोड कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here