सोलापूर : कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडकामासंदर्भातील अहवाल राज्याच्या नगरविकास विभागाने मागितला असून तो त्यांना देण्यात आला आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर चिमणीचे पाडकाम होईल़. या चिमणीमुळे विमान सेवेला अडथळा निर्माण होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
ते म्हणाले, आमच्या कॉन्ट्रक्टरच्या दिरंगाईमुळे चिमणी पाडकामाला वेळ लागत आहे मात्र आता चिमणीच्या पाडकामात कोणत्याही प्रकारची हयगत केली जाणार नाही़. पाडकाम आता अधिवेशनानंतर होणार आहे़. नगरविकास खात्याने चिमणी पाडकामाबाबत अहवाल मागविल्यामुळे चिमणीचे पाडकाम लांबणीवर गेले आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे.
अधिवेशन कालावधीत चिमणी पाडकामाचे काम होणार नाही, अधिवेशनानंतर चिमणीचे पाडकाम होईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.