तनपुरे साखर कारखाना चालविण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता

अहिल्यानगर :नगर जिल्हा बँकेने १५० कोटींच्या कर्ज वसुलीसाठी तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी चौथ्यांदा निविदा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आज (दि. २०) होणाऱ्या बँकेच्या मासिक सभेत हा विषय चर्चेस ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया घ्यावी यासाठी कारखाना बचाव समिती आग्रही आहे. याचबरोबर राहुरीतील एका शिष्टमंडळाने राहुरी कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच चालवायला घ्यावा यासाठी त्यांची भेट घेतली आहे.

सुमारे दीडशे कोटींचे कर्ज असलेला तनपुरे कारखाना गेले तीन वर्षे बंद आहे.जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला होता.तीन वेळा निविदा काढण्यात आली.या दरम्यान, यामध्ये डेक्कन कंपनी-यवतमाळ, मोहटादेवी शुगर, श्रीयुत दुग्गड-पुणे, राजपथ-पुणे आणि युवराज गाडे या चौघांनी निविदा फॉर्म नेले होतेमात्र एकच निविदा आली.पुणे येथील दुग्गड कंपनी कारखाना चालविण्यास इच्छुक असली तरी त्यांना मुदत जादा हवी होती.बँकने २५ वर्षांपर्यंत हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची तयारी दर्शविली.भाडेही कमी केले, मात्र, कंपनीला बँकेच्या अटी व नियम मान्य नव्हते. यातून निर्णय फिस्कटला.आता पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.दरम्यान, जिल्हा बँकेने कारखान्याच्या कर्जाचे केलेले पुनर्गठण बेकायदेशीर आहे.कारखाना भाडेतत्त्वावर देऊ नये. कारखाना बचाव कृती समिती आणि सभासद रस्त्यावर उतरून विरोध करतील, असे अमृत धुमाळ यांनी सांगितले. तर कारखाना बचाव समितीने राहुरी कारखाना अजित पवारांनी चालवायला घ्यावा, अशी भूमिका घेतल्याचे सुनील भट्टड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here