मुझफ्फरनगर : नव्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ४७१ हेक्टरवर ऊस पिकाची नव्याने लागवड झाली असून एकूण लागवड क्षेत्र १ लाख ७५ हजार ९५१ हेक्टरवर पोहोचले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी क्षेत्रफळ वाढले आहे. जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र शेतीयोग्य आहे. दरम्यान नव्या हंगामात गांगनौली साखर कारखान्याला ऊस वितरीत केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्या जिल्ह्यातील ऊस १३ साखर कारखान्यांना पुरवला जातो. मात्र, नव्या हंगामात तो केवळ १२ कारखान्यांना दिला जाईल. सर्वेक्षणातून गांगनौली साखर कारखान्याला यंदा वगळण्यात आले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्याचे ऊस लागवड क्षेत्र १ लाख ७१ हजार २३६ हेक्टर होते. यावेळी ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्या संयुक्त सर्व्हेनंतर ते १ लाख ७५ हजार ९५१ हेक्टर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा भैसाना साखर कारखान्यापेक्षा जास्त ऊस लागवड खाईखेडी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात झाली आहे. नव्या रोप लागणीत नऊ टक्क्यांची वाढ झाली असून खोडवा क्षेत्र घटले आहे. जिल्ह्यात खतौली,
तितावी, मन्सूरपुर, रोहाना, मोरना, टिकोला, भैसाना, खाईखेडी, देवबंद, थानाभवन, दौराला, मनावा हे कारखाने कार्यरत आहेत. सहारनपूर जिल्ह्यातील गांगनौली कारखान्याला गेल्यावेळी २०५ हेक्टरमधील ऊस देण्यात आला होता. यंदा जिल्ह्यातील आठ तर बाहेरील चार कारखान्यांना ऊस पुरवला जाईल असे सूत्रांनी सांगितले. जिल्हा ऊस अधिकारी संजय सिसौदिया यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस शेतीकडे ओढा वाढला आहे. परिणामी लागवड क्षेत्र वाढल्याचे दिसून येते.