हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : चीनी मंडी
साखर कारखान्यांच्या डिस्टलरी क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या १२ हजार ९०० कोटी रुपयांच्या कर्ज योजनेच्या विस्तारीत व्याज सवलतीला केंद्राने मंजुरी दिली आहे. आर्थिक विषयांवरील मंत्रिमंडळ समितीने २ हजार ७९० कोटी व्याज सवलतीला मंजुरी दिली आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ समितीच्या या निर्णयामुळे साखर उद्योगातील सध्याचा मागणी पुरवठ्याचा असमतोल दूर होणार आहे. यामुळे साखर कारखान्यांकडील कॅश फ्लो वाढणार आहे. त्याचबरोबर इथेनॉलचे उत्पादन वाढणार असून, सरकारचे महत्त्वाकांक्षी इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचे १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे टार्गेट पूर्ण होण्यास मदत होणार आहे. कर्जावरील व्याज दरातील सवलतीचा साखर उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल, असे मत ‘आयसीआरए’ संस्थेने व्यक्त केले आहे.
‘आयसीआरए’चे वरिष्ठ उपाध्यक्ष सब्यासाची मुजुमदार म्हणाले, ‘इथेनॉलचे उत्पादन जास्त करणे, हे पूर्णपणे सरकारच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. इथेनॉलच्या खरेदी किमतीला सरकारने सकारात्मक पाठिंबा देणे गरजेचे आहे. विशेषतः बी ग्रेड मळी आणि थेट उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलला सरकारने बळ देण्याची गरज आहे. कारण देशांतर्गत बाजारात साखरेपेक्षा इथेनॉल विक्री करणे परवडणारे नाही. साखर कारखान्याच्या नफ्याचा, कॅश फ्लोचा आणि एकूण गुंतवणुकीचा विचार करून, साखर उद्योगातील मागणी आणि पुरवठ्यात समतोल राखून सध्याच्या परिस्थितीत इथेनॉल उत्पादन करणे निर्णायक आहे.’
आयसीआरए या संस्थेने अतिशय सकारात्मक संकेत दिले आहेत. देशातील अनेक साखर कारखान्यांनी त्यांनी इथेनॉल क्षमता वाढविण्याचा निर्णय यापूर्वीच घेतल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर साखर कारखान्यांनी थेट उसाच्या रसापासून आणि बी ग्रेड मळीपासून इथेनॉल तयार केल्यामुळे, चालू हंगामात साखरेचे उत्पादन ५ लाखांनी घटणार आहे, असे निरीक्षण आयसीआरए संस्थेने नोंदवले आहे.
चालू हंगामात ३०७ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. हंगामाच्या सुरुवातीला ३१५ लाख टन उत्पादनाची शक्यता व्यक्त झाली होती. पण, ऊस इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात येत असल्याचाही साखर उत्पादनावर परिणाम होणार आहे.
देशाच्या बाजारात साखरेची मागणी २ ते ३ टक्क्यांनी वाढून ती २५८ लाख टनापर्यंत गेली आहे. तरीही देशात जवळपास ४५ लाख टन अतिरिक्त साखर उत्पादन होत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामाच्या शेवटी १२० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp