एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय

सोमवार पासून कारखाने सुरू
कोल्हापूर, ता. 10 : या वर्षीच्या गळीत हंगामात एकरकमी एफआरपी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये एकमत झाले आहे. उद्या (रविवार) साखर कारखान्यांकडून  ऊस तोडी दिल्या जातील आणि सोमवारपासून साखर कारखाने सुरू केले जाणार असल्याची माहिती साखर कारखानदारांच्या वतीने माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
श्री आवाडे म्हणाले, या वर्षी साखरेच्या दरात घसरण झाली आहे त्यामुळे ऊसाला एफ आर पी देणेही कठीण आहे त्यामुळे शेतकरी संघटनेने केलेले मागणी पाहता या फार अधिक दोनशे रुपये ही मागणी पूर्ण होणे शक्य नाही यावर कारखानदारांनी या वर्षीच्या हंगामात एक रकमी एफआरपी दिली जाणार आहे तसेच भविष्यात साखरेचे दर वाढले तर आणखी काही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल यावर सर्वच साखर कारखानदारांनी आपले एकमत केले आहे . यावेळी आमदार हसन मुश्रीफ आमदार सतीश पाटील संजय मंडलिक माजी आमदार पी एन पाटील तसेच साखर कारखान्यांची इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here