मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांच्या बगॅस आधारित सहवीज निर्मितीसाठी प्रकल्पांकडून महावितरणला वीज विक्री करण्यात आलेल्या प्रति युनिट विजेसाठी १.५० रुपयाप्रमाणे एकूण १४ साखर कारखान्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा आदेश काढला आहे. राज्याच्या साखर आयुक्तांनी अटी व शर्तीच्या अनुषंगाने छाननी करुन १४ साखर कारखान्यांचे प्रस्ताव शासनास सादर केले होते. राज्यातील साखर कारखान्यांच्या बगॅस आधारित सहवीजनिर्मितीसाठी प्रकल्पांकडून महावितरणला निर्यात करण्यात आलेल्या वीजेसाठी पात्र १४ साखर कारखान्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
साखर कारखान्यांच्या बगैस आधारित सहवीजनिर्मिती प्रकल्पांकडून (सहकारी व खाजगी) महावितरण यांना वीज विक्री करण्यात येत असलेल्या वीजेसाठी प्रति युनिट रु. १.५० प्रमाणे एकतीस कोटी एकसष्ट लक्ष नऊ हजार सातशे रुपये इतके अनुदान पात्र १४ साखर कारखान्यांना उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील अनुदानप्राप्त कारखाने पुढीलप्रमाणे, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना (ता. पंढरपूर, जि. सोलापूर), क्यूनर्जी शुगर इंडस्ट्रिज समुद्राळ (ता.उमरगा, जि. धाराशिव), दौंड शुगर लि.. आलेगाव (जि.पुणे, फेज-२), ओलम ग्लोबल अॅग्रो कमोडिटीज इंडिया प्रा.लि.,( राजगोळी खुर्द, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) द्वारकाधीश साखर कारखाना लि., (शेवरे ता. सटाणा, जि. नाशिक), कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ ससाका (म.अंकुशनगर यु.-१, ता. अंबड, जि. जालना), भैरवनाथ शुगर वर्क्स लि., यूनिट क्र.६ संचलित तेरणा शेतकरी ससाका (घोकी, जि.धाराशिव), बारामती ॲग्रो लि (फेज-३ शेटफळगडे, ता. बारामती, जि.पुणे), अथणी शुगर्स लि., लिजड युनिट रयत ससाका (शेवाळवाडी – म्हसोली ता. कराड, जि.पुणे)