नवी दिल्ली: भारतामध्ये कोरोनाची गती आता मंदावत आहे. गेल्या 24 तासांमध्ये केवळ 31,522 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत आणि 412 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाची गती मंद झाल्याने देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात 37,725 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशामध्ये कोरोनामुळे संक्रमित लोकांचा आकडा 97,67,372 वर पोचला आहे. पण आतापर्यंत 92,53,306 रुग्ण बरे झाले आहे. अशामध्ये देशामध्ये सक्रिय रुग्ण 3,72,293 इतके आहेत. भारतामध्ये कोरोना तपासणीची संख्या सातत्याने वाढत आहे. जवळपास प्रति दिन 10 लाखापेक्षा अधिक नमुन्यांची तपासणी होत आहे. यामुळे गतीने संक्रमितांवर उपचार होत आहेत.
भारतामद्ये कोरोनाचा रिकवरी रेट चांगला झाला आहे. देशामध्ये संक्रमणामुळे मुक्त होण्याचा दर 94.73 झाला आहे. तर सक्रमितामध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 3.81 टक्के आहेत. मृत्यु दरही केवळ 1.45 टक्के आहे. अनेक विकसित देशांमध्ये मृत्यु दर यापेक्षा अधिक दिसून येत आहे. भारतामध्ये पॉजिटिव्हीटी रेटही 3.41 टक्के आहे. भारतच असा देश आहे की, ज्याने आतापर्यंत सर्वात जास्त कोरोना टेस्ट केल्या आहेत.
गेल्या 24 तासात 9,22,959 नमुन्यांची तपासणी झाली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या तपासणीसाठी एकूण 15,07,59,726 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.