मुंबई : बुधवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला. सकाळी साधारणतः १०.३५ वाजता जेव्हा निप्टी ५० इंडेक्स १५५.५ अंकांच्या घसरणीसह १७६७१.२ वर ट्रेड करीत होता. तर सेन्सेक्स ५२१.४५ अंकांच्या घसरणीसह ६०१५१.२७ वर ट्रेड करीत होता. या घसरणीच्या काळातही शुगर सेक्टरमधील काही शेअर्स वाढून ट्रेड करीत होते. यामध्ये उत्तम शुगर मिल्स (०.९९% अप), धरनी शुगर्स अँड केमिकल्स (०.९७% अप), धामपूर शुगर मिल्स (०.६१% अप) आणि बन्नारी अम्मन शुगर्स (०.३९% अप) यांचा समावेश होता.
तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रिज (४.७२% डाउन), ईआयडी पेरी (२.४५% डाउन), श्री रेणुका शुगर्स (२.३०% डाउन), बजाजहिंद (२.३०%डाउन), डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज (२.२७% डाउन), अवधसुगर (२.१२% डाउन) , पोन्नी शुगर्स (इरोड) (२.०९% डाउन), कोठारी शुगर्स अँड केमिकल्स (१.८९% डाउन), द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज (१.५०% डाउन) आणि शक्ती शुगर्स (१.४३% डाऊन) यांचा समावेश आहे.