मनिला : साखर नियामक प्रशासन (एसआयए) चा पुरवठा आणि मागणीच्या रिपोर्टच्या आधारावर फिलीपीन्समध्ये साखर उत्पादन 2.4 मिलियन मेट्रीक टन होण्याची शक्यता आहे, जे गेल्या वर्षी पीक वर्षाच्या 4 टक्के वृद्धी दाखवतो. पण स्थानिक आणि विदेशी दोन्ही बाजारातून मागणी 5 टक्के कमी होवून 1.71 मेट्रीक टन झाली आहे. उत्पादनात वाढ आणि कमी मागणीमुळे साखर उद्योगासमोरील संकट अधिक दाट होण्याची शक्यता आहे.
कन्फेडरेशन ऑफ शुगर प्रॉड्युसर्र असोसिएशन इंक चे प्रवक्ता रेमंड मॉन्टिनोला म्हणाले की, उच्च साखर उत्पादन नेहमीच स्वागतार्ह असते, पण जर कोरोना महामारी तशीच राहिली, तर साखरेच्या उत्पादनात बाधा येवू शकते. साखरेचा वापर करणार्या उद्योगांनी कोरोनामुळे आपली ऑर्डर कमी केली आहे. कारण त्यांचा साखरेचा स्टॉक अजूनही संपलेला नाही. जवळपास सर्वच व्यवसायांना मर्यादा आल्या आहेत. सध्याच्या साखरेच्या किंमतींनी उद्योगाच्या दुर्दशेला यापूर्वीच दाखवून दिले आहे कारण कारखाना गेटवर साखरेच्या किमंतीमध्ये पूर्वीच 8 टक्के घट आली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.