चालू गळीत हंगामात उत्तर प्रदेशमध्ये साखर उत्पादनात घट दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते सरासरी उतारा घटल्याने उत्तर प्रदेशमध्ये या हंगामात साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) म्हणण्यानुसार, राज्यात १२० साखर कारखान्यांनी ३१ मार्च २०२१ अखेर ९३.७१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. आतापर्यंत ३९ कारखान्यंचे गाळप बंद झाले आहे. गेल्यावर्षी ११३ कारखान्यांनी गाळप हंगामात भाग घेतली होता. ३१ मार्च २०२० पर्यंत ९७.२० लाख टन साखर उत्पादन झाले होते.
दुसरीकडे देशात २०२०-२१ या हंगामात ५०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले. यापैकी २८२ कारखाने आतापर्यंत बंद झाले आहेत. यावर्षी ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरू असलेल्या २२१ कारखान्यांच्या तुलनेत गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत १८६ कारखाने सुरू होते. कारखान्यांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत एकूण २७७.५७ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तर गेल्यावर्षी
३१ मार्च २०२० अखेर २३३.१४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी उत्पादनात ४४.४३ लाख टनाची वाढ झाली आहे.