बिजनोर : बिजनोरमधील नऊपैकी सहा साखर कारखान्यांना ऊस विभागाने शेतकऱ्यांची ऊस बिले थकवल्याबद्दल नोटीस जारी केली आहे. या कारखान्यांनी अद्याप शंभर टक्के ऊसाचे पैसे दिलेले नाहीत. मे महिन्यात शेतकऱ्यांना हे पैसे मिळणे अपेक्षित होते. ऊस विभागाने साखर कारखान्यांना हे पैसे देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुंदकी आणि बहादूरपूर साखर कारखान्यांनी शंभर टक्के ऊस बिले दिली आहेत.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बिजनोरचे ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, बिजनोरमध्ये नऊ साखर कारखाने आहेत. यापैकी दोन कारखान्यांनी चालू आर्थिक वर्षातील १०० टक्के बिले दिली आहेत. तर एका कारखान्याने ९५.५ टक्के बिले दिली आहेत. आम्ही सहा कारखान्यांना नोटीस जारी केली आहे. आणि त्वरीत ऊस बिले देण्यास सांगितले आहे. मात्र, आम्ही आणखी १५ दिवस प्रतीक्षा करू. त्यानंतर जर हे कारखाने बिले देण्यात अपयशी ठरले तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.