शामली, उत्तर प्रदेश: शामली चा अपर दोआब साखर कारखाना सुरु होण्यामध्ये विलंब होईल. पहिल्यांदा दोन नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती, पण तांत्रिक कारणांमुळे विलंब होत आहे.
गेल्या वर्षी 30 ऑक्टोबरला गाळप हंगामाचा शुभारंभ झाला होता. पण जवळपास एक आठवड्यापर्यंत कारखान्यात बिगाड येत होता . यावेळी दोन नोव्हेंबर ची तारीख निश्चित करण्यात आली होती आणि 19 ऑक्टोबर ला बॉयलर पूजनही झाले होते. 28 ऑक्टोबर ला ऊस समित्यांना 30 ऑक्टोबर साठी खरेदी केंद्रांवर ऊसासाठी इंडेंट जारी करण्याची योजना होती. पण आता कारखाना 5 नोव्हेंबरला सुरु होण्याची शक्यता आहे. कारखान्यात साफ सफाई, मशीन देखभाल दुरुस्ती एक महिन्यापूर्वी सुरु झाली होती. साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक डॉ. कुलदीप पिलानिया यांनी सांगितले की, काही तांत्रिक कारण आहे, ज्यामुळे दोन नोव्हेंबरला गाळप सुरु होवू शकत नाही. काही दिवस उशीर होईल. लवकरच नवी तारीख निश्चित केली जाईल. याप्रमाणे खरेदी केंद्रांवर ऊस खरेदीसाठी इंडेंट जारी होईल. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादुर सिंह यांनी सांगितले की, थानाभवन आणि ऊन साखर कारखान्याकडून खरेदी केंद्रांवर खरेदीसाठी 30-31 ऑक्टोबरला इंडेंट जारी करण्यात आला आहे. दोन्ही कारखान्याचे संचालन एक नोव्हेंबरपासून सुरु होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.