दिल्ली-बिहारसह या राज्यांत आज पाऊस, लखनौत तापमान ४१ डिग्री सेल्सिअसवर

नवी दिल्ली : उत्तर भारतातील राज्यांना मे महिन्यातील भीषण उन्हाचा तडाखा बसला आहे. वाढती उष्णता आणि ४० डिग्रीपेक्षा अधिक तापमान यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. मात्र, आज देशाची राजधानी दिल्लीत ढगाळ वातावरणासह हलका पाऊस कोसळू शकतो. तर पुर्वोत्तर भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल. गडगडाटासह काही ठिकाणी चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, नवी दिल्लीत आज किमान तापमान २६ डिग्री तर कमाल तापमान ४१ डिग्री सेल्सिअसपर्यंत राहिल. नवी दिल्लीत हलका पाऊस पडू शकतो. मात्र, याचा तापमानावर फारसा परिणाम होणार नाही. तर १८ मे रोजी दिल्लीत गडगडाटासह पाऊस पडेल. तर तापमान ४० डिग्रीपेक्षा अधिक होऊ शकते.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौत आज किमान तापमान २७ डिग्री तर कमाल तापमान ४१ डिग्रीपर्यंत राहिल. लखनौत आज वातावरण साफ असेल. गाजियाबादमधील स्थिती अशीच राहील. स्कायमेट या एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार आज बिहारमध्ये हलका पाऊस पडू शकतो. केरळ, जम्मू – काश्मीर, हिमाचल प्रदेशातही पावसाची शक्यता आहे. हरियाणा, राजस्थान, दिल्लीच्या काही भागात ढगाळ वातावरण राहिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here