नवी दिल्ली: कोरोना वायरस बाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीच्या सीमा एका आठवड्यासाठी बंद केल्या गेल्या आहेत आणि केवळ आवश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल. केजरीवाल यांनी सांगितले की, जनतेकडून सूचना मागवल्यानंतर आम्ही एका आठवड्यात पुन्हा निर्णय घेऊ.
याशिवाय ते म्हणाले की, आता दिल्ली मध्ये बार्बर शॉप आणि सलून बरोबरच सर्व इंड्रस्टी खुली होईल. मुख्यमंत्री म्हणाले की, आता ऑटो रिक्शा आणि ई -रिक्शा मधून एक प्रवासी नियमही हटवला आहे.
मुख्यमंत्री यांनी लोकांना WhatsApp नंबर 8800007722 च्या माध्यमातून सूचना पाठवणे आणि delhicm.suggestions@gmail.com वर ईमेल करणे किंवा 1031 वर कॉल करण्यासाठी सांगितले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.