नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल ९०.८३ रुपये तर डिझेल ८१.३२ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे.
पेट्रोलच्या दरात २५ पैसे तर डिझेलच्या दरात ३५ पैशांची वाढ करण्यात आली. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल, डिझेलवर कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि विकास सेस (एआयडीसी) लागू केला. पेट्रोलवर २.५ रुपये प्रतिलिटर तर डिझेलवर ४ रुपये प्रतिलिटर सेस आकारण्यात आला आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत (१४.२ किलो) ५० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. चौदा फेब्रुवारी रोजी झालेल्या या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये गॅस सिलिंडर ७६९ रुपयांना उपलब्ध आहे.