नवी दिल्ली : देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये सलग अकराव्या दिवशी झालेल्या दरवाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला. शुक्रवारी पेट्रोलचा दर ९०.१० रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ८०.६० रुपये प्रतिलिटर बनला.
आज पेट्रोलच्या किमतीत ३१ पैसे तर डिझेलमध्ये ३३ पैशांची वाढ झाली.
अलिकडेच केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलवर कृषी विकास सेस लागू केला. हा सेस पेट्रोलसाठी २.५ रुपये प्रतिलिटर तर डिझेलवर ४ रुपये आकारण्यात आला आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलोग्रॅम) किंमतीत १४ फेब्रुवारी रोजी ५० रुपयाची वाढ करण्यात आली. त्यानंतर गॅस सिलिंडर ७६९ रुपयांना मिळत आहे.