नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली एनसीआर आणि जवळपासच्या परिसरात आज मंगळवारी दुपारी जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह जोरात पाऊस झाला. राजधानीमध्ये मंगळवारी दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले होते आणि पाऊस सुरु झाला. दरम्यान विजेचा जोरात गडगडाट सुरु होता. हवामान विभागाने सांगितले की, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल.
रविवारी दिल्लीमध्ये मान्सून चा पहिल्याच मुसळधार पावसात चार लोकांचा मृत्यु झाला होता.
हवामान विभागाने एक दिवसापूर्वी सोंमवारी पुढच्या दोन दिवसात दिल्ली एनसीआर सह आसपासच्या भागात मध्यम पाउस होण्याची शक्यता वर्तवली होती. राष्ट्रीय राजधानीमद्ये काही ठिकाणी पुढच्या दोन दिवसात मोठा पाऊस होवू शकतो. हवामान विभागाने सांगितले होते की, दिल्ली,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश मध्ये पुढच्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान तज्ञांनी सांगितले की, उत्तर पश्चिमी भारतात पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये बंगालच्या खाडीतून येणार्या आर्द्र पूर्वी हवा आणि अरबी समुद्रातून येणार्या दक्षिण पश्चिमी वार्याचा मेळ होईल. दरम्यान, इथे मान्सूनही आला आहे. या दोन कारणांमुळे पुढच्या 24 तासात दिल्ली एनसीआर मध्ये मध्यम ते मोठ्या पावसाची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.