कोल्हापूर, दि. 28 : सरकारने एफआरपी बेस बदलला आहे. याचा ऊस उत्पादकांसह साखर कारखान्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे एफआरपीचा बेस साडेनऊ टक्केच करावा या मागणीसाठी 30 नोव्हेंबरला संसदेवर मोर्चा काढून संसदेला घेराव घालण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत दिला. खासदार राजू शेट्टी म्हणाले सरकारने एफआरपी चा 9.5 बेस १० टक्के करून शेतक-यांवर अन्याय केला. तो रद्दबातल करावा, शेतकर्यांचा सातबारा कोरा करून शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, या मागणीसाठी ३० नोव्हेंबरला संसद
भवनाला घेराव घालण्यात येणार आहे. यासाठी देशातील गोष्ट बदक एकवटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील २०७ शेतकरी संघटनेच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फ हे आंदोलन करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.