कोल्हापूर : आसुर्ले – पोर्ले येथील दत्त – दालमिया भारत शुगर साखर कारखाना सुरू ठेवून एफआरपी अधिक १०० रुपयांच्या तोडग्याबाबत कारखाना प्रशासन आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने त्याचा परिणाम उसाच्या गाळपावर होणार आहे.
कारखाना बंद पडल्याने पोर्ले तर्फ ठाणे आणि आसुर्ले येथील लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने संघटनेच्या कार्यकर्त्यांना बैठकीत केली. यावेळी लोकप्रतिनिधी प्रकाश पाटील, पृथ्वीराज सरनोबत, शहाजी खुडे, संभाजी जमदाडे, एम. एम. पाटील, विलास शिंदे, तानाजी भोपळे, जीवन खवरे, प्रकाश चौगुले, दालमिया प्रशासनाचे अधिकारी श्रीधर गोसावी, सुहास गुडाळे, संग्राम पाटील, शिवप्रसाद देसाई, रामचंद्र घराळ आदी शेतकरी उपस्थित होते.