उत्पादन खर्चाच्या आधारावर ऊस दर देण्याची मागणी

मेरठ : भारतीय किसान संघाने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या आधारावर उसाचा लाभदायी दर द्यावा अशी मागणी केली आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन दिले.

या निवेदनात भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, देशभरात शेतकऱ्यांमध्ये पिकाला योग्य दर मिळत नसल्याने असंतोषाचे वातावरण आहे. किमान समर्थन दर ठरलेला असतानाही मंडयांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन कमी दरात खरेदी केले जाते. कृषी उत्पादनांचे दर नेहमीच वाढू दिले जात नाहीत. त्यामुळे बाजाराची स्वतंत्र व्यवस्था विकसीत होऊ शकलेली नाही. शेती करण्याचा खर्च वाढला आहे. भारतीय किसान संघाने केंद्र सरकारकडे देशातील शेतकऱ्यांना खर्चाच्या आधारावर दर देण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी केली आहे. त्यांनी बीडीओंच्या माध्यमातून राष्ट्रपतींना पाठविण्यास हे निवेदन दिले. निवेदन देणाऱ्यांमध्ये जिल्हा मंत्री ठाकुर मनोज, मनीष सोम, प्रवीण प्रधान, पिंटू दादरी, नीटू, गुलशन, वीर सिंह, आजाद राणा, नंगला राठी आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here