गळीत हंगामाचा कालावधी वाढवण्याची ऊस मंत्र्यांकडे मागणी

बुलंदशहर : सरकारने गळीत हंगामाचा कालावधी वाढवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीबाबत आमदारांनी ऊस मंत्र्यांशी चर्चा केली. हंगामाचा कालावधी वाढवल्यास शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस कारखान्याला पाठवला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना ऊस घेऊन भटकावे लागणार नाही.

भाजपच्या कार्यालयात आमदार विजेंद्र सिंह यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना ऊस हंगामातील अडचणी सांगितले. साबितगड साखर कारखान्याचा गळीत हंगाम एक – दोन दिवसात पूर्ण केला जाणार आहे. मात्र, कार्यक्षेत्रात अद्याप खूप ऊस शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. कोरोनामुळे लागू केलेल्या कर्फ्यूमुळे अनेक कामगार कारखान्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गळीत हंगामाचा कालावधी वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदारांकडे केली.

तर आमदार सिंह यांनी सांगितेल की, त्यांनीही कार्यक्षेत्राचा दौरा केला असून ऊस शिल्लक असल्याचे दिसले आहे. याबाबत त्यांनी ऊस मंत्री सुरेश राणा यांच्याशी चर्चा केली. त्रिवेणी साखर कारखान्याचा गळीत हंगाम पाच जूनपर्यंत वाढविण्याची मागणी केली. मंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिल्याचे आमदारांनी सांगितले. याशिवाय, आमदारांनी मंत्री राणा यांना निवेदनही पाठवले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here