फिलिपाइन्समध्ये साखर पुरवठा निश्चित करण्याची मागणी

मनिला : अमेरिकेला होणारी साखर निर्यात तात्पुरती रोखण्याच्या फिलीपाइन्स साखर नियामक मंडळाच्या (एसआरए) निर्णयानंतरही सिनेट सदस्य जुआन मिगुएल जुबरी यांनी देशातील साखरेचा पुरवठा निश्चित करण्याचे निर्देश शुगर रेग्युलेशन अॅथॉरिटीला दिले आहेत. पुढील वर्षापर्यंत देशात पुरेशी साखर आहे का याची पडताळणी केली जाणे गरजेचे आहे असे ज़ुबीरी यांनी सांगितले.

फिलिपाईन्समध्ये साखरेचे उत्पादन सप्टेंबर महिन्यात सुरू होते. हा हंगाम पुढील वर्षी ऑगस्टमध्ये संपतो. याबाबत जुबरी यांनी सांगितले की, यावर्षी पिकाच्या उत्पादनातून साखरचे पुरेसे उत्पादन होणार नाही. एसआरएने सुरुवातीला चालू वर्षी २.१९० मिलियन मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असा अंदाज वर्तविला होता. मात्र, नव्या आकडेवारीनुसार, साखरेचे उत्पादन सुमारे ९०,००० मेट्रिक टनाने घटण्याची शक्यता आहे.
गाळप हंगाम संपल्यानंतर एसआरएला पुरेशी साखर आहे की नाही हे निश्चित करता आले पाहिजे असे जुबिरी म्हणाले. एसआरएने आधी आमच्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here