तामिळनाडू मध्ये साखर कारखाने करत आहेत हँड सॅनिटायजरचे उत्पादन

कोयंबतूर : कोरोना वायरसशी लढण्यासाठी संपूर्ण देशभरात हँड सॅनिटायजरची मागणी वाढली आहे. देशातील असंख्य साखर कारखाने हँड सॅनिटायजर बनवण्यासाठी झटत आहेत. सध्या अर्थिक संकटात सापडलेल्या साखर कारखान्यांसाठी सॅनिटायजरचे उत्पादन हा उत्पन्नाचा एक नवा पर्याय ठरू शकतो.

साउथ इंडिया शुगर मिल्स एसोसिएशन चे अध्यक्ष पलानी जी. पेरियासामी म्हणाले की, हँड सॅनिटायजर चे उत्पादन अशा साखर कारखान्यांसाठी केवळ एक पुढचे पाऊल आहे, जे यापूर्वीच इथेनॉलचा पुरवठा करत आहेत.

पेरियासामी यांनी सांगितले की, हँड सॅनिटायजर हे निश्चितपणे उत्पन्नाचे साधन बनू शकते, पण याची मागणी कधीपर्यंत राहील हे केवळ COVID-19 नंतरच कळू शकेल. किती कंपन्या हँड सॅनिटायजर चे उत्पादन घेऊ शकतात हे यावरुन निश्चित होईल. तामिळनाडूतील बऱ्याच साखर कारखान्यांकडे डिस्टलरी आहे आणि त्यांच्या जवळ हँड सॅनिटायजर उत्पादनाची क्षमताही आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here