सहारनपूर : रामपूर मनिहरण येथे भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी थकीत ऊस बिले त्वरीत मिळावीत अशी मागणी केली. तालुकाध्यक्ष कानसिंह राणा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या नावे आपल्या मागण्यांचे निवेदन एसडीएम संगीता राघव यांना दिले. निवेदनात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व्याजासह ऊस बिले त्वरित देण्यात याीत अशी मागणी करण्यात आली.
भाकियूच्यावतीने देण्यात आलेल्या अन्य मागण्यांमध्ये विज बिलांतून शेतकऱ्यांचे शोषण केले जाऊ नये, हिडन नदीत सांडपाणी रोखण्यासाठी सरकारने निर्देश द्यावेत, बाजारातील किटकनाशकांच्या दुकानांत बोगस औषध विक्री सुरू आहे, ती थांबवावी, बाजारातील सिंथेटिक मिठाईच्या विक्रीची तपासणी करावी अशी मागणी केली. यावेळी उप जिल्हाधिकार संगीता राघव यांनी आश्वासन दिले की, या समस्या लवकरच सोडविण्यात येतील. निवेदन देणाऱ्यांमध्ये रामभूल, प्रमोद सत्येंद्र, वीरेंद्र सिंह, प्रवीण, जबर सिंह, राजेश, अजय संजय आदी कार्यकर्ते उपस्थित होते.