ढाका : बांगलादेशातील लोकांना आता खाद्य तेलापाठोपाठ साखरेच्या महागाईचा फटका बसणार आहे. स्थानिक शुगर रिफायनरींनी साखरेची किंमत Tk10 प्रती किलो करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, वाणिज्य मंत्रालयाने आतापर्यंत दरवाढीस मंजूरी दिलेली नाही.
सेंटर फॉर पॉलिसी डायलॉगचे (सीपीडी) मुस्तफिजूर रहमान यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंच्या किमती वाढल्याने स्थानिक किंमतीवर याचा परिणाम होणार आहे. मात्र, सरकारला जागतिक बाजारपेठेवर नजर ठेवण्याची गरज आहे. दरवाढ रोखण्यासाठी सरकारकडून स्थानिक बाजारपेठेवर करडी नगर ठेवण्याचीही गरज आहे. यापूर्वी वाणिज्य मंत्रालयाने तेल रिफायनरींना दरवाढईबाबत विचारणा केली होती. विविध व्यापारी संघटनांशी चर्चेनंतर खाद्य तेलाच्या दरवाढीला मंजुरी देण्यात आली होती.
अशाच पद्धतीने बांगलादेश शुगर रिफायनरी असोसिएशनने (बीएसआरए) साखरेची किंमत Tk75 ते Tk85 प्रती किलो आणि पॅक न केलेली साखर Tk74 प्रती किलोवरुन Tk80 करण्याचा प्रस्ताव दिला आहे.