ऊस दरात वाढ करण्याची भाकियूची मागणी

बिजनौर : भारतीय किसान संघाची मासिक बैठक ऊस समितीच्या कार्यालयात झाली. या बैठकीत ऊसाचा दर ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी करण्यात आली.

ऊस समितीमध्ये आयोजित बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारने प्रती क्विंटल दर ४०० रुपये करावा अशी मागणी केली. याशिवाय शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले व्याजासह देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असे सांगण्यात आले. एकीकडे कोरोनाचा प्रकोप सुरू आहे, अशा काळात शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण, आरोग्य सुविधा यांसाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. मात्र, साखर कारखाने शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्याशिवाय आता खरीप हंगामातील इतर शेतीकामे, खते, किटकनाशके यांच्यासाठी शेतकऱ्यांना पैसे खर्च करण्याची गरज आहे. युरीया, डीएपी, किटकनाशके, औषधे खरेदीसाठी शेतकरी साखर कारखान्यांकडील पैशाकडे नजर लावून बसले आहेत. त्यामुळे ऊस बिले तातडीने देण्याची मागणी करण्यात आली.

बैठकीस जितेंद्र, लाखन सिंह, विरेंद्र सिंह, हिमांशू, सुरेश, जगदेव, यादराम, सत्यपाल, धर्मेंद्र आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here