बिजनौर : भारतीय किसान युनियनने साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवावी आणि थकीत ऊस बिले देण्याबाबत किसान सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. यावेळी लोनिवी भवनमध्ये पंचायत आयोजित करुन समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
लोनिवी निरीक्षण भवनात मदन सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय किसान युनियनची पंचायत झाली. यावेळी अवनीश कुमार व मुकेश कुमार यांनी नेतृत्व केले. शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात गाझीपूर सीमेवर सुरू ठेवलेल्या आंदोलनात टप्प्याटप्प्याने सहभाग वाढविण्याविषयी चर्चा केली. भात खरेदी केंद्रांवर वजन योग्य पद्धतीने व्हावे, खराब वीज मिटर तातडीने बदलावेत, तलावांची सफाई करावी तसेच ऊस वाहतुकीच्या मार्गांची दुरुस्ती केली जावी आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
माजी विभागीय उपाध्यक्ष चौ. बलराम सिंह, सरदार इक्बाल सिंह, ठाकूर गजेंद्र सिंह, विनोद कुमार परमार, महेंद्र सिंह, भोपाल राठी यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य व्यवस्थापक सुखवीर सिंह यांची भेट घेतली.
शेतकऱ्यांनी कारखान्याची गाळप क्षमता वाढवावी, ऊसाचे थकीत बिल द्यावे आदी मागण्यांबाबत निवेदन दिले. यावेळी हुकम सिंह, शेर सिंह, रुकन सिंह, महेंद्र सिंह, जयपाल सिंह, अर्जेंद्र सिंह, सत्यपाल, अजय कुमार, रोहित, ओमप्रकाश, भोपाल राठी, डॉ.शरीफ, साजिद आदींसह शेतकरी उपस्थित होते.