मुरादाबाद : भारतीय किसान युनियनने मंडल आयुक्तांकडे पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याचबरोबर मंझावली साखर कारखान्याने त्वरीत थकीत ऊस बिले द्यावीत या मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. भाकीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष हरपाल सिंह यांनी मंडल अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले
भाकियूने सांगितले की, साखर कारखान्याने गेल्या हंगामातील उसाचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत. संभल जिल्ह्यातील मझावली कारखान्याने पैसे थकवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना व्याजासह पैसे देण्याची गरज आहे. हरपाल सिंह यांनी सांगितले की, कारखान्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत. मझावली कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे पैसे दिले आहेत.
यावेळी भाकियूचे महासचिव चौधरी महक सिंह, मंडल अध्यक्ष डूंगर सिंह यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दोन दिवसांच्या पावसाने आणि पुराने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे तातडीने सर्वेक्षण करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी चौधरी शिव सिंह, वीर सिंह, रुद्र प्रताप सिंह, होशियार सिंह ,जय वीर सिंह यादव दिलशाद आदी उपस्थित होते.