शामली (मेरठ): थकित ऊस बिले व्याजासह देण्याची मागणी भारतीय किसान युनीयनने केली आहे. सोबतच सध्याच्या गळीत हंगामातील ऊस दर ४५० रुपये प्रति क्विंटल निश्चित करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भारतीय किसान युनीयनच्या बैठकीत हिंड गावामध्ये आयोजित जिल्हाध्यक्ष जमील अहमद यांनी सांगितले की गेल्या गळीत हंगामातील ऊसाची बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. आता गळीत हंगाम होऊन दीड महिना उलटला आहे.
त्यामुळे गेल्या हंगाातील बिले शेतकऱ्यांना व्याजासह देण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कुमार यांच्याकडे पाच मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींच्या नावे देण्यात आले आहे. ऊसाचा दर ४५० रुपये प्रति क्विंटल जाहीर करावा, थकीत ऊस बिल त्वरीत व्याजासह द्यावे, शेतकऱ्यांच्या विजेची थकबाकी माफ करावी आणि सवलत द्यावी, तसेच दिल्लीमध्ये एमएसपीच्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे.
मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राव खालिद, सनव्वर अली, जगदीश, ताज मोहम्मद, अंसार राणा, मदन सिंह जावेद आदी उपस्थित होते.