म्हैसूर, कर्नाटक : ऊसाचा जादा योग्य तथा लाभदायी दर (एफआरपी) मिळविण्यासाठी एक आठवड्यापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारला आंदोलन तीव्र करण्चाचा इशारा दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री एस. टी. सोमशेखर यांच्यावर शेतकरी नाराज आहेत. शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, वाढीव एफआरपीच्या मुद्याबाबत मंत्र्यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला आहे.
शेतकरी नेते कुरुबुर शांता कुमार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, राज्य सरकार उद्योगपती आणि बड्या गुंतवणूकदारांच्या तालावर नाचत असल्याचे मंत्री सोमशेखर यांच्या भूमिकेतून दिसून येते. ते म्हणाले की, जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर आंदोलन तीव्र केले जाईल. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून आंदोलन सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.